मोफत वैद्यकीय सेवा
ग्रामीण व शहरी भागात मोफत तपासणी शिबिरे, औषधोपचार व रेफर सेवा.
प्रत्येक जीवनाला सन्मान,
प्रत्येकाला नव्याने जगण्याची संधी
भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे कार्य करणारी संस्था
“माणूस बदलला तर समाज बदलेल; समाज बदलला तर राष्ट्र महान होईल.”
आमचा ठाम विश्वास आहे की कोणताही माणूस जन्मतः गुन्हेगार, व्यसनी, भिकारी किंवा समाजबाह्य नसतो; परिस्थिती, गरिबी, शोषण, अज्ञान, मानसिक आघात आणि सामाजिक उदासीनता यामुळे अनेकांना त्या अवस्थेत ढकलले जाते.
प्रत्येक वंचित, उपेक्षित, पीडित आणि संकटग्रस्त व्यक्तीला सुरक्षितता, सन्मान, उपचार, पुनर्वसन, शिक्षण, रोजगार, स्वावलंबन आणि नवजीवनाची संधी उपलब्ध करून देणे.
आम्ही कोणत्याही व्यक्तीकडे तिची जात, धर्म, भाषा, लिंग, लैंगिक ओळख, आर्थिक स्थिती, व्यवसाय, आरोग्यस्थिती किंवा भूतकाळ पाहून कधीही भेदभाव करणार नाही. आमच्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रथम "माणूस" आहे.
पुनर्वसन, सन्मान, सक्षमीकरण आणि सामाजिक पुनर्एकीकरण — आमचे मूळ ध्येय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मानवी सन्मानाने जगण्याची संधी देणे.
लैंगिक ओळखीमुळे भेदभाव भोगणाऱ्या व्यक्तींना सुरक्षितता, शिक्षण आणि स्वावलंबनाची संधी.
लैंगिक विविधतेचा आदर, समावेश आणि सामाजिक स्वीकृतीसाठी निरंतर प्रयत्न.
कलंक विरहित जीवन, पुनर्वसन, व्यवसाय प्रशिक्षण आणि नव्या आयुष्याची सुरुवात.
सामाजिक कलंकापासून मुक्त, आर्थिक स्वावलंबन आणि मानसिक आधार.
आश्रय, उपचार, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी मार्गदर्शन.
समावेशी विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि समान संधींचे अधिकार.
एकांतवास, आरोग्य सेवा आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात सन्मान.
विषहरण, पुनर्वसन, समुपदेशन आणि दीर्घकालीन मानसिक आरोग्य आधार.
मुख्य प्रवर्तक, गंगा हरजीवनदास रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च फाउंडेशन, नाशिक
नमस्कार,
मानवी प्रतिष्ठा, सामाजिक न्याय, संविधाननिष्ठा आणि सर्वसमावेशक विकास या मूल्यांवर दृढ विश्वास ठेवून “गंगा हरजीवनदास रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च फाउंडेशन, नाशिक ” स्थापन करण्याचा संकल्प करीत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, वंचित, शोषित, व्यसनाधीन, निराधार आणि सामाजिक मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची नवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी माझे ज्ञान, वेळ, अनुभव आणि सामर्थ्य समाजकार्यास अर्पण करण्याची प्रतिज्ञा करतो.
संस्था कोणत्याही जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग, लैंगिक ओळख, राजकीय विचार, आर्थिक स्थिती किंवा सामाजिक पार्श्वभूमीचा भेदभाव न करता, भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे कार्य करेल.
आमचा विश्वास आहे क समाजाचा विकास कवळ आर्थिक प्रगतीने होत नाही; तर सर्वात दुर्बल व्यक्ती़लाही सन्मानाने जगण्याची संधी मिळाल्यावरच खऱ्या अर्थाने राष्ट्र प्रगत होते.
मानवतेची सेवा हीच आमची सर्वोच्च प्रेरणा असून,
पुनर्वसन, सक्षमीकरण आणि सामाजिक पुनर्एकीकरण
हाच आमच्या कायाचा मूलमंत्र राहील.
“प्रत्येक जीवन अमूल्य आहे, प्रत्येक व्यक्तीला दुसरी संधीमिळण्याचा अधिकार आहे.”
– डॉ. अद्वय प्रशांत हिरे-पाटील
मुख्य
प्रवर्तक
गंगा हरजीवनदास रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च फाउंडेशन, नाशिक
समाजातील वंचित, उपेक्षित आणि संकटग्रस्त व्यक्तींना उपचार, संरक्षण, शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनाची संधी देणारे सर्वसमावेशक उपक्रम.
विषहरण, निवासी पुनर्वसन, समुपदेशन, योग, ध्यान आणि दीर्घकालीन पुनर्प्राप्ती.
महिला व बालसंरक्षण, कायदेशीर सहाय्य आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण.
शिष्यवृत्ती, कौशल्य विकास, उद्योजकता आणि स्वावलंबनासाठी रोजगार सहाय्य.
मोफत आरोग्यसेवा, HIV जागरूकता, समुदायाचा आधार आणि पुन्हा सन्मानाने उभे राहण्याची साथ.
संविधाननिष्ठ मूल्यांवर आधारित संशोधन, जनजागृती आणि दीर्घकालीन सामाजिक सुधारणा.
कोणताही माणूस तिरस्काराचा नाही.
कोणताही जीव निरुपयोगी नाही.
कोणताही भूतकाळ अंतिम नाही.
प्रत्येकाला दुसरी संधी मिळायलाच हवी.
"चला, आपण अशी चळवळ उभी करूया जिथे दानापेक्षा सन्मान, सहानुभूतीपेक्षा सक्षमीकरण आणि उपकारापेक्षा समानतेला अधिक महत्त्व असेल."
समाजातील विविध वंचित घटकांसाठी सर्वसमावेशक, संशोधनाधिष्ठित उपक्रम
ग्रामीण व शहरी भागात मोफत तपासणी शिबिरे, औषधोपचार व रेफर सेवा.
व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांद्वारे व्यक्तिगत आणि गट समुपदेशन.
वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, पुस्तके व मार्गदर्शन.
कायदेशीर सल्ला, दस्तऐवजीकरण व न्यायालयीन मदत.