आधुनिक व्यसनमुक्ती केंद्रे
अत्याधुनिक सुविधांसह व्यसनमुक्ती केंद्रे उभारणे.
आम्ही व्यसनाकडे गुन्हा म्हणून नव्हे, तर उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची गरज असलेली वैद्यकीय व सामाजिक समस्या म्हणून पाहतो.
अत्याधुनिक सुविधांसह व्यसनमुक्ती केंद्रे उभारणे.
RESIDENTIAL REHABILITATION CENTRES सुरू करणे.
मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक यांच्या माध्यमातून सेवा.
DETOXIFICATION पासून दीर्घकालीन पुनर्प्राप्ती पर्यंत संपूर्ण उपचार प्रणाली.
योग, ध्यान, अध्यात्म, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासाद्वारे मानसिक बळ.
व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार.
FAMILY COUNSELLING करून नातेसंबंध पुन्हा उभे करणे.
शाळा, महाविद्यालये, उद्योग आणि ग्रामीण भागात व्यापक व्यसनमुक्ती जनजागृती.
आमचे ध्येय केवळ व्यसन सोडवणे नाही, तर आयुष्य पुन्हा घडवणे आहे.
समाजातील विविध वंचित घटकांसाठी सर्वसमावेशक, संशोधनाधिष्ठित उपक्रम
ग्रामीण व शहरी भागात मोफत तपासणी शिबिरे, औषधोपचार व रेफर सेवा.
व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांद्वारे व्यक्तिगत आणि गट समुपदेशन.
वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, पुस्तके व मार्गदर्शन.
कायदेशीर सल्ला, दस्तऐवजीकरण व न्यायालयीन मदत.
सुरक्षित निवारा, समुपदेशन व पुनर्वसनासाठी समर्पित केंद्रे.
रस्त्यावरील व अनाथ मुलांसाठी शिक्षण, पोषण व सुरक्षित वातावरण.
जागरूकता, चाचणी, उपचार सहाय्य व सामाजिक समावेशन.
वैद्यकीय व मानसिक देखरेखीखाली सुरक्षित पुनर्वसन.
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेमळ निवारा, आरोग्य व मनोरंजन.
पालकविहीन मुलांसाठी घर, शिक्षण व भावनिक आधार.
व्यावसायिक प्रशिक्षण व प्रमाणपत्रे रोजगारक्षमतेसाठी.
कौशल्य जुळवणी, मुलाखत तयारी व नियोक्ता जोडणी.
लघुउद्यम, सूक्ष्म वित्त व व्यवसाय मार्गदर्शन.
महिलांसाठी बचत, कर्ज व सामूहिक सक्षमीकरण.
उद्योजकता प्रशिक्षण, मार्केट लिंकेज व मेंटॉरशिप.
सहाय्यक साधने, थेरपी व समावेशी शिक्षण.
आपत्कालीन सज्जता, बचाव प्रशिक्षण व पुनर्वसन.
जागरूकता मोहीम, शिबिरे व मोबिलायझेशन.
हरित उपक्रम, स्वच्छता मोहीम व शाश्वत शेती.
डेटा आधारित संशोधन व धोरण शिफारसी.
ही संस्था पुढील समाजघटकांसाठी सर्वसमावेशक पद्धतीने कार्य करेल...
देहव्यवसायात कार्यरत महिला व त्यांची मुले
लैंगिक शोषण, मानवी तस्करी किंवा जबरदस्तीने देहव्यवसायात ढकललेल्या व्यक्ती
गिगोलो म्हणून कार्य करणारे व लैंगिक शोषणाला बळी पडलेले पुरुष
एलजीबीटीक्यूआयए+ समाजबांधव
जन्मतः HIV बाधित मुले तसेच HIV सह जीवन जगणाऱ्या व्यक्ती
भिक्षावृत्ती करणारे नागरिक
दिव्यांग व्यक्ती
गतीमंद मुले
परित्यक्ता, विधवा व एकल माता
अनाथ, निराधार व रस्त्यावरची मुले
पाल्यांनी सांभाळण्यास नकार दिलेले ज्येष्ठ नागरिक
प्रकल्प ग्रस्त व बेघर कुटुंबे
मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त व्यक्ती
व्यसनाधीन युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक
निवृत्त लोककलावंत
देवदासी
PR बॉण्ड्स साठी प्रतीक्षेत असलेले जामीन झालेले बंदी
६५ वर्षांवरील रुग्णालयात दाखल असलेले बंदी
यु.टी. मध्ये असलेले बंदी व त्यांचे कुटुंबीय
या अभियानासाठी आम्हाला केवळ देणगीदार नकोत; आम्हाला सहप्रवासी हवेत. डॉक्टर, वकील, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, समाजसेवक, शिक्षक, उद्योगपती, उद्योजक, पत्रकार, कलाकार, निवृत्त अधिकारी, विद्यार्थी, स्वयंसेवक, CSR संस्था, संशोधक आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रामाणिक इच्छा असलेला प्रत्येक नागरिक या चळवळीचा भाग होऊ शकतो.
तुमचा वेळ, तुमचे ज्ञान, तुमचे कौशल्य, तुमचा अनुभव आणि तुमची संवेदनशीलता — यांपैकी कोणतीही गोष्ट एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते.
सहप्रवासी व्हाआम्ही कोणत्याही व्यक्तीकडे तिची जात, धर्म, भाषा, लिंग, लैंगिक ओळख, आर्थिक स्थिती, व्यवसाय, आरोग्यस्थिती किंवा भूतकाळ पाहून कधीही भेदभाव करणार नाही. आमच्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रथम “माणूस” आहे.
कोणताही माणूस तिरस्काराचा नाही. कोणताही जीव निरुपयोगी नाही. कोणताही भूतकाळ अंतिम नाही. प्रत्येकाला दुसरी संधी मिळायलाच हवी.
“सेवा हीच मानवतेची सर्वोच्च साधना.”
कायालयाचा पत्ता
‘निमगाव हाऊस’ गणेश नगर, जिओ बीपी पंप समोर, गुलमोहर विहार, स्व. सितामाई सावळीराम काळे मार्ग, सातपूर, नाशिक – ४२२ ००७.
भ्रमणध्वनी: ९०११० ४५६७८
ई-मेल: contact@gangafoundation.life
वेबसाईट: www.gangafoundation.life